काही लिहायचे आहे मला…
तुम्हाला मराठी मध्ये लिहण्याची इच्छा असेल पण काय लिहायचे असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर सोपे आहे. आपण काय काम करतो, कुठल्या विषय आपल्याला जास्त प्रिय आहे आणि त्याबद्दल चांगले माहित पण आहे त्याबद्दल तुम्ही लिहू शकतात. जसे की तुम्ही संगणक तज्ञ आहात तर तुम्ही संगणकाशी संबंधित लेख लिहू शकतात की त्याची काळजी कशी घ्यावी, त्याचा योग्य वापर कसा करावा, त्या क्षेत्रात होणारे बदल वैगेरे. तुम्ही आर्थिक क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्रातील घडामोडी, शेयर बाजार वैगेरे बाबतीत लिहू शकतात. तुम्ही सौंदर्य तज्ञ असाल तर सौंदर्याची काळजी/त्वचेची कशी घ्यायची ह्या बाबतीत लिहू शकतात. तुम्ही ज्योतीषी असाल तर ज्योतीष शास्त्रावर लिहु शकतात. भाषा तज्ञ असाल तर एखाद्या भाषेसंदर्भात लिहु शकतात.
व्यासपीठ – एक नवीन मराठी संकेतस्थळ
राम राम मंडळी,
व्यासपीठाच्या ब्लॉग वर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे.
आपल्याला एका नविन संकेतस्थळ व्यासपीठ ची माहिती देण्याचा हा प्रयत्न.
व्यासपीठ हे एक नविन संकेततस्थळ मराठी लेखक आणि वाचकांसाठी सुरु करण्यात आलेले आहे. हे एक मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ आहे.
आपण येथे कुठल्याही विषयावर लेख लिहून तो व्यासपीठ द्वारे प्रकाशित करू शकता. तसेच व्यासपीठावर प्रकाशीत झालेले साहित्य तुम्ही दुसर्या संकेतस्थळावर पण पुन्रप्रकाशीत करु शकतात.
प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या विषयात तज्ञ असतो, त्या प्रत्येकाचे ज्ञान/अनुभव व्यासपीठ ह्या संकेतस्थळाद्वारे मराठी मध्ये यावे आणि मराठी भाषेतील ज्ञान भंडार वाढावे त्याकरिता हा एक छोटासा प्रयत्न.
तुमचा प्रतीसाद जरुर कळवा.
धन्यवाद