व्यासपीठ – एक नवीन मराठी संकेतस्थळ

राम राम मंडळी,

व्यासपीठाच्या ब्लॉग वर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे.

आपल्याला एका नविन संकेतस्थळ व्यासपीठ ची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

व्यासपीठ हे एक नविन संकेततस्थळ मराठी लेखक आणि वाचकांसाठी सुरु करण्यात आलेले आहे. हे एक मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ आहे.

आपण येथे कुठल्याही विषयावर लेख लिहून तो व्यासपीठ द्वारे प्रकाशित करू शकता. तसेच व्यासपीठावर प्रकाशीत झालेले साहित्य तुम्ही दुसर्‍या संकेतस्थळावर पण पुन्रप्रकाशीत करु शकतात.

प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या विषयात तज्ञ असतो, त्या प्रत्येकाचे ज्ञान/अनुभव व्यासपीठ ह्या संकेतस्थळाद्वारे मराठी मध्ये यावे आणि मराठी भाषेतील ज्ञान भंडार वाढावे त्याकरिता हा एक छोटासा प्रयत्न.

तुमचा प्रतीसाद जरुर कळवा.

धन्यवाद